लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, तथा अहवाल सादर करा, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना पत्र पाठवून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या मूल शहरात चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार झाल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीने गंभीर स्वरूपाचा हल्ला केला आहे. याबाबत अज्ञात हल्लेखाेरांना तात्काळ अटक करण्यात यावी, याविषयी माझे आपणाशी याआधीही दूरध्वनीवर वारंवार बोलणे झाले आहे. याबाबत तात्काळ हल्लेखोरांना अटक करण्यात यावी व सविस्तर अहवाल कळवावा असेही मुनगंटीवार यांनी परदेसी यांना म्हटले आहे. आज हल्ला होऊन दहा दिवसांचा अवधी झालेला आहे. हल्लेखोर कार मधून आले, या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हीडीओ चित्रीकरण आहे. त्यानंतरही आरोपी पोलिसांना गवसले नाही याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा… शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी केली ‘कापूस होळी’; पांढरकवड्यात असाही सत्याग्रह
विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर हल्ले वाढले आहेत. बल्लारपूरात अशाच पध्दतीने हल्ला झाला होता. त्यानंतर कॉग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरही चंद्रपूर शहरात हल्ला झाला होता. आता थेट जिल्हा बँकेचे अध्यक्षावर गोळीबार झाला आहे. गुन्हेगारी वाढत आहेत ही भूषणावह बाब नाही. तेव्हा हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री विजय वडेट्टीवार गटाच्या कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे ही बाब योग्य नाही अशीही सर्वत्र चर्चा आहे.