नागपूर : सोने- चांदीचे दर नियंत्रणात येताना दिसत नाहीत. २४ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५ दरम्यान सलग तीन दिवस सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु गुढीपाडवाच्या एक दिवसापूर्वी सोने- चांदीच्या दराने ग्राहकांचे टेंशन वाढवले आहे. नागपुरातील सराफा बाजारात २० मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८९ हजार २०० रुपये होते. हे दर आजपर्यंतचे विक्रमी दर आहेत. त्यानंतर दरात घट वा वाढ नोंदवली जात आहे. सोमवारी (२४ मार्च २०२५) रोजी सोन्याच्या दरात किंचित घट झाली होती. त्यानंतर २५ मार्च २०२५ आणि २६ मार्च २०२५ लाही सोन्याच्या दरात सलग तीन दिवस घट झाली. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात बुधवारी (२६ मार्च २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८१ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६८ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार १०० रुपये नोंदवले गेले होते.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गुडीपाडवाच्या एक दिवसापूर्वी शनिवारी (२९ मार्च २०२५ रोजी) सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८३ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५८ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नगापुरात २६ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २९ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार २०० रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याला दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना जास्त खिसा रिकामा कराव लागणार आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात २६ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९९ हजार ५०० रुपये होते. हे दर आज शनिवारी (२९ मार्च २०२५ रोजी) प्रति किलो १ लाख १ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात २६ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २९ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो २ हजार रुपयांची वाढलेले दिसत आहे.