नागपूर : प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. ही थरार घटना बुधवारी पहाटे तीन वाजातच्या सुमारास मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये घडली. जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा असे खून झालेल्या गेस्ट हाउस मालकाचे नाव आहे. मोहम्मद परवेज (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जमील अहमद यांचे तहसिल पोलीस ठाण्याअंतर्गत रहमान चौक, मोमीनपुरा येथे तीन माळ्यांची इमारतीत अल करीम या नावाने गेस्ट हाऊस चालवायचे. यासोबतच प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसायही करीत होता. याच व्यवसायातून आरोपी मोहम्मद परवेज याच्यासोबत ओळख झाली. मागील सहा वर्षांपासून ते मिळून संपत्ती खरेदी विक्रीच्या व्यवसाय करीत होते. गेल्या काही दिवसांपासून जमील आणि आरोपी परवेज यांच्या प्रापर्टी खरेदी विक्रीवरून वाद होता. आरोपी परवेज त्याच्या दोन साथीदारासह गेस्ट हाऊसमध्ये आला.  त्याने जमीलशी वाद घातला आणि थेट पिस्तूल काढून जमील यांच्या डोक्यात गोळी झाडली. गेस्ट हाउसमध्ये प्रचंड खळबळ उडाली. माहिती मिळताच तहसिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवला.