लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियमाप्रमाणे कुटुंब निवृनिवेतनाबाबत तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत. सध्याच्या पध्दतीनुसार शासकीय कर्मचारी व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्यू नंतर अविवाहित मुलगी २४ वर्षाची होईपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते. तसेच अपंगत्व असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन न मिळण्याची तरतूद आहे.
मुलगी घटोस्फोटित असेल व स्वत:चा उदरनिर्वाह करू शकत नसेल तर अशा प्रकरणात केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या वारसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत नियमात सुधारणा केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने निवृत्तीवेतन सुधारणा केली आहे. त्याचे परिपत्रकही जारी केले आहे. त्यानुसार अविवाहित, घटस्फोटित मुलींना अटी व शर्तीवर निवृत्ती वेतन प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आणखी वाचा-वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
कर्मचारी ज्यावेळी निवृत्त होईल त्यावेळी त्याने मूळ निवृत्ती वेतन पत्रकात पात्र वारसदारांचा समावेश करावा. लागेल या शिवाय अनेक कागदोपत्री पूर्तता करावी लागणार आहे. मुलगी घटस्फोटित असेल तर कायदेशीर घटस्फोटाची सर्व कागदपत्रे कर्मचाऱ्यांना जोडावी लागेल त्याच प्रमाणे मुलगी अपंग असेल तरी त्याबाबतचे सर्व प्रमाणपत्रे, जन्माचा दाखला व तत्सम कागदपत्रे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती वेतन पत्रिकेसोबत जोडावे लागणार आहे. त्याची पडताळणी केल्यावरच पुढचेपाऊल सरकारकडून उचलले जाणार आहे. या संदर्भातील शासन आदेश अलीकडेच निर्गमित करण्यातआलाआहे.