नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत ते प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे चिंतन विस्तृत, व्यापक आहे. अशाप्रकारचे देशात फारच थोडे नेते आहेत, असे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
ॲग्रो व्हीजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आज नागपुरातील पीडीकेव्ही ग्राऊंड, दाभा येथे त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा… सणासुदीच्या दिवसांत एसटीला ६ कोटींचे उत्पन्न
ते म्हणाले, मी गडकरी यांच्या आदर करतो. त्यांनी केवळ देशभरात रस्तेच बांधले नाही तर शेतकऱ्यांचे हितासाठी मोठे काम केले. यावेळी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनेश शहा, डॉ. सी.डी. मायी, रवी बोरटकर, रमेश मानकर उपस्थित होते.