नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहेत. शहरात गुंडांच्या टोळ्यांची संख्येतही वाढ झाली असून प्रत्येक टोळीकडे पिस्तूल आणि अन्य तिष्ण शस्त्रांची भरमार आहे. शहरात गेल्या चार वर्षांत तब्बल ९४ गुन्हे दाखल झाले असून १०६ पिस्तूल आणि जवळपास ७०० वर काडतूस पोलिसांनी जप्त केली आहेत. नव्याने आलेल्या पोलीस आयुक्तांसमोर बंदुकबाजांवर नियंत्रण ठेवण्याचे नवे आव्हान उभे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील नामांकित गुंड सध्या कारागृहात असल्यामुळे शहरात नवगुन्हेगारांनी डोके वर काढले असून त्यांच्या नवनवीन टोळ्या तयार होत आहेत. झटपट पैसा कमावणे आणि समाजात दहशत निर्माण करण्यासाठी टोळीचे म्होरके हे वसुली, हप्ते आणि खंडणीतून मिळवलेल्या पैशातून पिस्तूल किंवा धारदार शस्त्रे विकत घेतात. शहरातील जवळपास प्रत्येक गँगकडे अवैधरित्या घेतलेले पिस्तूल आढळतात. गेल्या चार वर्षांत ९४ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी १०६ पिस्तूल जप्त केले आहेत. २०२३ मध्ये सर्वाधिक ३९ पिस्तूल आणि १४१ काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या शहरात गुन्हे शाखा, पोलीस उपायुक्तांची विशेष पथके आणि पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी बंदुकबाज गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच शहरात दिवसेंदिवस पिस्तूल वापरणाऱ्या गुंडांची संख्या वाढत आहेत.

हेही वाचा – नागपूर : टीप मिळताच घातला दरोडा, पोलिसांनी ३६ तासांच्या आत ठोकल्या बेड्या…

पिस्तुलांची खरेदी-विक्री झाली सोपी

देशीकट्ट्यासह विदेशी बनावटच्या पिस्तूल फक्त २५ हजार ते ६० हजारांत सहज उपलब्ध होतात. उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार या राज्यातून महाराष्ट्रात पिस्तूल आणल्या जातात. तर मध्यप्रदेशातील दावलबेडी, उंडीखोदर, सिरवेल, सिंगनू, अंबा, नवलपुरा आणि सीतापुरा या परिसरात देशी पिस्तूल बनविल्या जातात. देशी कट्टे येथूनच नागपुरात येत असल्याची माहिती आहे.

गुन्हे शाखेची पथके ‘पांढरा हत्ती’

शहरात पूर्वी गुन्हे शाखेचा वचक होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुन्हे शाखेतील कर्मचारी केवळ वसुलीसाठी धडपड करीत असतात. गुन्हे शाखेत नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने जुने कर्मचारी कारवाईपेक्षा अर्थपूर्ण संबंधावर भर देतात. पिस्तुलाची कारवाई केल्यानंतर विक्रेत्यापर्यंत पोलीस कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळे वापरणारे सापडतात परंतु पिस्तूल विक्रेते मोकाटच असतात.

हेही वाचा – नागपूर : उपराजधानीत नवे पोलीस आयुक्त रुजू होताच हत्याकांडाची मालिका; वाठोड्यात कुख्यात गुंडांची हत्या

वर्ष – गुन्हे – जप्त पिस्तूल
२०२० – २७ – ३०
२०२१ – २२ – २२
२०२२ – ११ – १५
२०२३ – ३४ – ३९

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gun culture is growing in nagpur the terror of the gunmen increased 106 pistols seized in 94 crimes in four years adk 83 ssb