नागपूर : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. परंतु महामंडळाच्या दाव्याप्रमाणे राज्यातील २५० आगारातील सर्व बस सकाळी मार्गस्थ झाल्या. त्यामुळे सदावर्ते यांच्या संघटनेचा संप फसला काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : बर्डी बाजारपेठेत दिवाळी खरेदीची तुफान गर्दी अन् दुकानाला आग

हेही वाचा – गडचिरोली : खासदार अशोक नेतेंचा अपघात की घातपात? पोलिसांकडे व्यक्त केलेल्या शंकेवरून चर्चांना उधाण

दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारण्यात आल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. दरम्यान एसटीच्या इतर बऱ्याच संघटना संपात नव्हत्या. त्यांनी सदावर्ते यांच्यावर टीकाही केली होती. दरम्यान एसटी महामंडळाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील २५० आगारांतील सकाळी ७ वाजेपर्यंतच्या सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरून निघाले आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunaratna sadavarte organization called the st strike failed corporation says mnb 82 ssb