नागपूर : लोकसत्ता लोकांकिकेच्या नागपूर विभागीय अंतिम फेरीत धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या ‘गटार’ एकांकिकेने बाजी मारत १५ डिसेंबरला मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्थान पक्के केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र या एकांकिने पटकावले. शिवाय प्रकाश योजना, संगीत दिग्दर्शन, नेपथ्य, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनयासह उत्कृष्ट एकांकिका अशी सात पारितोषिके ‘गटार’ला मिळाली.  विभागीय अंतिम फेरीसाठी पाच एकांकिकांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गटार’ प्रथम, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाची ‘पंचम वेद’ द्वितीय तर विद्यापीठाच्या ललित कला विभागाची ‘अथांग’ने तिसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकाला ७,५०० रुपयांचे तर तृतीय क्रमांकाला ५,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या व्यतिरिक्त राष्ट्रीय ज्युनियर महाविद्यालयाची ‘भाजी वांग्याची’ आणि वसंत डी.एड. महाविद्यालयाची ‘इंक- क्रेडिएबल फेसऑफ’या दोन एकांकिकाही सादर करण्यात आल्या. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर होते. त्यांच्याच हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर परीक्षक म्हणून कलावंत मंगेश कदम आणि लेखक अरविंद औंध उपस्थित होते. एकूण १० पारितोषिके यावेळी देण्यात आली. सुप्रिया राजगुरू हिला प्रकाश योजनेसाठी, आशीष दुर्गे ला संगीत दिग्दर्शनासाठी, नेपथ्यासाठी ऋतिक अमाळकर, उत्कृष्ट लेखक म्हणून वीरेंद्र गणवीर यांना सन्मानपत्र आणि प्रत्येकी १००० रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अभिनयाचे १५०० रुपयांचे पारितोषिक श्रेयश अतकर याने पटकावले. कार्यक्रमाला लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक सारंग पाटील, उपव्यवस्थापक गजानन बोबडे आणि नरेंद्र शुक्ला, सहाय्यक व्यवस्थापक अनंता तेलरांधे उपस्थित होते. सहाय्यक व्यवस्थापक नितीन ईश्वरे यांनी  कार्यक्रमाचे संचालन केले.