वर्धा : विद्यार्थी विकास हाच प्रथम समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास, हे निश्चित. पण तसे धोरण हवे. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा झाली. धोरण तर आले पण त्याची अंमलबजावणी पण गरजेची. त्यासाठी ते धोरण समजून घेणे पण आवश्यक. अंमल करणार कोण, तर शाळा संचालक. म्हणजेच संस्थाचालक. त्यासाठी ६ जानेवारी हा महत्वाचा दिवस आहे. पूणे येथील ज्ञान विज्ञान संशोधन केंद्राने यासाठी उपक्रम पुरुस्कृत केला आहे. या दिवशी ज्ञानरंजन शैक्षणिक प्रकल्प कार्यशाळा आयोजित आहे. त्याचा वेबिनार होणार असून नोंदणी सूरू झाली आहे.

केंद्राचे संचालक सुभाष देशपांडे तसेच सल्लागार समिती सदस्य जागृती धर्माधिकारी व रवींद्र फडणवीस हे आहेत. ज्ञान विज्ञान प्रकल्प शैक्षणिक धोरण उद्देशपूर्ती व अचूक अंमलबजावणी साठी सादर होत आहे. या कार्यशालेत संस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्थाचालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे आयोजक नमूद करतात.

हेही वाचा – “आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

दुपारी ३ वाजता हा वेबिनार सूरू होणार. यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक धोरण नियंत्रण समितीचे सदस्य डॉ. श्रीपाद ढेकणे व डॉ. मिलिंद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतील. या कार्यशाळेत काय मार्गदर्शन होणार, ते समजून घ्या. शैक्षणिक धोरण मार्गदर्शक तत्वे, धोरणाचे टप्प्या टप्प्याने आकलन, शाळांनिहाय उपाय व शैक्षणिक तज्ञा सोबत संवाद साध्य होणार. सहभाग घेतलाच पाहिजे कारण ही एक सुवर्णसंधी आहे. शैक्षणिक सुधारणा करण्यात अग्रेसर राहण्यासाठी आपल्या शाळेचे नेतृत्व सर्व त्या आयुधाने सक्षम करण्यास ही कार्यशाळा आवश्यक ठरते. असे आयोजक नमूद करतात.

राष्ट्रीय शैक्षणिक उत्क्रांतीत ज्ञानरंजन हे सर्वसमावेशक असे नावीन्यपूर्ण साधन ठरणार. डिजिटल शिक्षणातील प्रवर्तक असलेले राज्याच्या शिक्षण खात्याच्या सहकार्याने कार्यरत आहेत. परिणामकरक बदलाचे ते साक्षीदार असल्याचा दावा होतो. पवित्र शिक्षणाची पताका देशाबाहेर फडकवीन्यासाठी विद्यार्थी सज्ज होतील. ज्ञानरंजन हे शिक्षण म्हणजे उद्याचे भविष्य घडविण्याचा पाया यावर विश्वास ठेवते. हे केंद्र पारंपरिक व डिजिटल शिक्षण यातील दुवा ठरणार.

हेही वाचा – “काँग्रेसने सात विधानपरिषदेच्या जागा दिल्या होत्या परंतु, भाजपसोबत बारा वर्षांपासून युती करूनही…”, केंद्रीय मंत्र्यांचे विधान चर्चेत

ज्ञान रंजनचा हेतू शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना भविष्य उज्वल करण्यासाठी सक्षम करावे असा आहे. या अनुषंगाने शैक्षणिक धोरण संबंधित राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ दर्जाचा अभ्यासक्रम विकसित करण्याचे ध्येय आहे.

Story img Loader