लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : जीममध्ये प्रशिक्षक असलेल्या युवकाने अभियंता तरुणीवर बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन साडेसहा लाख रुपयांनी फसवणूक केली.

पीडित २६ वर्षीय युवतीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. ती एका जीममध्ये जात होती. रोहित याने सुध्दा इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असून जीम प्रशिक्षक म्हणून काम करतो. जीमदरम्यान दोघांनी ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे तिनेही प्रियकरासोबत त्याच जीममध्ये महिला प्रशिक्षक म्हणून नोकरीला लागली. रात्री जीम बंद झाल्यानंतर रोहित तिच्यावर रोज बलात्कार करीत होता. रोहितने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैँगिक शोषण केले. त्याने जीममध्ये भ्रमणध्वनी लपवून तिचे नग्न छायाचित्रे घेतली तर शारीरिक संबंध प्रस्थापित करतासुद्धा लपून चित्रफित काढली.

आणखी वाचा-बुलढाणा : महिलांसह शेतकऱ्यांचे तब्बल अर्धा किलोमीटर ‘लोटांगण’ आंदोलन…

अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन रोहितने तिच्याकडून साडेसहा लाख रुपये घेतले. लग्नाचा विषय काढल्यावर तो टाळाटाळ करायचा. आपत्तीजनक छायाचित्र कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी देवून लग्नास नकार दिला. भयभीत झालेल्या पीडितेने पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरूध्द अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर करीत आहेत.

पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. रोहित संजय पांडे (३२) रा. हुडकेश्वर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gym trainer abused women engineer and shoot video hiding cell phone in gym adk 83 mrj