लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला: वाशीम जिल्ह्यातील एका सात वर्षीय चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी अकोल्यात मृत्यू झाला. त्या चिमुकल्याच्या ‘एच३एन२’ अहवाल सकारात्मक आला आहे. या चिमुकल्यावर अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आणखी वाचा- अपूर्ण झोपेमुळे मधुमेह, लठ्ठपणासह इतर आजारांचा धोका

वातावरणातील अचानक बदलामुळे व्हायरलच्या तापाने डोकेदुखी वाढवल्याने घरोघरी सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही रुग्णांचा ताप आठवडाभर, तर खोकला दोन आठवड्यांच्या वर जात असल्याने ‘एच३एन२’चा धोका वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेमध्ये एका रुग्णाचा ‘एच३एन२’ अहवाल सकारात्मक आला होता. या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. अहवाल येण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे.