नागपूर: मंगळवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटझाली. यात हिंगणा तालुक्यातील येरणगाव दाभा येथील रोशन देवराव निंबुलकर यांच्या  पोल्ट्री फार्ममधील बारा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचे नुकसान तर होतच आहे पण आता शेतक-यांच्या जोडधंद्यालाही त्याचा फटका बसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निंबुलकर यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये दोन शेड होते. प्रत्येक शेडमध्ये सहा हजार कोंबड्या होत्या. चोहोबाजूंनी झालेल्या गारांचा मारा झाल्याने कोबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे निंबुळकर यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm hit all around 12 thousand hens died in nagpur district cwb 76 ysh
Show comments