मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे ५ ते १२ चे वर्ग भरतात. मात्र येथे शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तत्काळ शिक्षक देण्यात यावे, या मागणीसाठी पालकांनी ऐन कडाक्याच्या थंडीत अर्धनग्न ठिय्या आंदोलन पुकारले आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

हेही वाचा >>> दागिन्यांच्या अवाजवी घडणावळीचा ग्राहकांना ताप, सोन्यावरील कलाकुसर पडतेय महागात; ग्राहकांच्या खिशाला झळ

शाळेत मूलभूत सोई सुविधाचा अभाव आहे. मात्र, अशाही परिस्थितीत गोरगरिबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत. मंगरुळपीर शहरात जिल्हा परिषद हायस्कूल आहे. येथे ५ ते १२ चे वर्ग भरतात. शहरांसाह ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र येथे मोठया प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे हताश झालेल्या शिक्षकांनी थेट पंचायत समिती समोर ऐन कडाक्याच्या थंडीत अर्ध नग्न ठिय्या आंदोलन पुकारले आहे. एकीकडे जिल्हा परिषद हायटेक होत असताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.