राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालयाने कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल केला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी २ डिसेंबर रोजी अहीर यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पत्रक काढून या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: ‘देवेंद्र अंकल ऐकाना… माझ्या पप्पांना जुनी पेंशन द्याना’; संपकऱ्यांच्या वाहन रॅलीतील बालकाने वेधले लक्ष

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष रोष्टरनुसार भरण्याकरिता सुनावणीद्वारा आढावा घेतानाच ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्नांबाबत अत्यंत जागरूकतेने कार्य करीत आहे. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते प्रभावीपणे कार्यरत आहेत. अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे ४ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोळसा व स्टीलसह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावर उल्लेखनीय कार्य केले आहे. १६ व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच उर्वरक व रसायन मंत्री या पदांचे निर्वहन सुद्धा त्यांनी प्रभावीपणे केले आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल झाल्याबद्दल अहीर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Story img Loader