लोकसत्ता टीम
चंद्रपूर : मी कुणावर आरोप करीत नाही. पण जिल्ह्यात ग्राम पंचायत पासून तर पंचायत समिती पर्यंत व नगर परिषद, महापालिका पासून तर जिल्हा परिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता असताना माझा पराभव झालाच कसा हा प्रश्न मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महायुतीच्या पहिल्याच जिल्हास्तरीय मेळाव्यात भाजप नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतीत केला. मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजपला ही एकमेव जागा जिंकता आली नाही. बुथवर गडबड झाली का? असा थेट सवाल त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात ग्राम पंचायत पासून पंचायत समिती पर्यंत, नगर पालिका, महापालिका पासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वत्र भाजपाची सत्ता होती. तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर लोकसभा मतदार संघात माझा पराभव झाला. दारूमुळे अथवा, जातीमुळे माझा पराभव झाला नाही, वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदार संघात मला प्रचंड आघाडी होती. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व वरोरा-भद्रावती या चार विधानसभा मतदार संघात बुथवर गडबड झाली का. मी कुणावर आरोप लावत नाही, पराभवाची नेमकी कारणे काय , पराभवाची कारणे वेगवेगळी असू शकतात, मात्र पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे असे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले.

आणखी वाचा-वर्धा : जिल्हा बँकेला दिलासा; राष्ट्रवादीच्या मदतीस भाजप आमदाराची धाव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वत्र आघाडी होती. तेव्हा देशात भाजपाने २८८ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ३०३ खासदार असताना मित्र पक्षांना सोडले नव्हते. निवडणूक आपण जिंकण्याकरिता लढतो. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसने चंद्रपूर ही एकमेव जागा जिंकली, असे का झाले हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे असेही अहीर म्हणाले. बुथवर चूक झाली म्हणून २०१९ ची लोकसभा पराभूत झाली का, जातीवर लोकसभा झाली तर वणी, आर्णी मध्ये मी आघाडी घेतली नसती. दारू मुळे पराभव झाला हे खरे नाही, जातीमुळे पराभव झाला हे खरे नाही, तर बूथ वर गडबड झाली काय, पराभवाची कारणे काय आहे. पराभवाची करणे वेगळी असतात. परिश्रम शिवाय विजय मिळू शकत नाही. निवडणूक हरलो, आता भाजप बूथ वर काम करते आहे. जातीवर मतदान होत नाही. विचारांवर मतदान होत असेही अहीर म्हणाले. अहिर यांचे भाषण सुरू असताना मंचावरील महायुतीच्या सर्व नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते.