|| राम भाकरे

तीन महिन्यांत १ हजार ८१३ करोनाबाधितांचे मृत्यू

नागपूर : शहरात मागील तीन महिन्यात करोनामुळे एकू ण १ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी  सर्वाधिक मृत्यू (२७०) हनुमाननगर झोनमध्ये तर सर्वात कमी सतरंजीपुरामध्ये (७४ )  झाले.  एकू ण मृत्यूंमध्ये ७० टक्के मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. प्रत्यक्षात करोना व इतर आजारांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच हजारच्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली. फेब्रुवारी व मार्च महिन्यात बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी मृत्यू कमी होते. मात्र एप्रिल महिन्यात मृत्यूचा आकडा तिप्पट झाला. महापालिकेत गेल्या तीन महिन्यात १ हजार ८१३  करोनाबाधित मृत्यू झाल्याची नोंद आहे. इतर आजारांमुळे प्राण गमावलेल्यांचा समावेश के ला तर हा आकडा पाच हजारावर जात असल्याची माहिती आहे.

फेब्रुवारी महिन्यात ७८, मार्च महिन्यात ४७२ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात हा आकडा तब्बल १२२२ वर गेला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च आणि एप्रिल महिन्यात मृत्यूची संख्या वाढली आहे.  सर्वाधिक मृत्यू  हुनमाननगर झोनमध्ये झाले. या झोनमध्ये घरोघरी जाऊन चाचण्या केल्या जात आहे. रुग्ण अधिक असलेल्या वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित के ले जात आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी  विशेष पथक महापालिके ने तयार के ले  आहे.