कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार कौशल्यावर भर; सहा महिन्यांत नवीन अभ्यासक्रम

देवेश गोंडाणे

‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ने औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्यांची आवश्यकता लक्षात घेऊन कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील सहा महिन्यांत नवीन अभ्यासक्रम तयार होणार असून २०२४ पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

रोजगाराच्या हव्या तशा संधी मिळत नसल्याने राज्यात गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाकडे कल कमी होत आहे. अशातच देशात व जगात औषधनिर्माण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध व्यवसायांना मागणी वाढत आहे. तसेच रोजगारांच्या विविध संधी मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असल्याने औषधनिर्माण अभ्यासक्रमांना (बी.फार्म. व डी.फार्म.) प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी बारावीनंतर दोन वर्षांच्या डी.फार्म. या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात २७५ औषधनिर्माण महाविद्यालयामधून पंधरा हजारांवर विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. कंपन्यांना आवश्यक असलेले कौशल्याधारित विद्यार्थी तयार करण्याच्या दिशेने ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ने पाऊल उचलले आहे. याचाच भाग म्हणून आता औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे.

या अभ्यासक्रमाला कौशल्याची जोड देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. सध्या भारत सरकारने कौशल्य विकास अभ्यासक्रमावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आता ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’नेही त्यादिशेने पाऊल उचलले असून लवकरच नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.