लोकसत्ता टीम
वर्धा : तालुक्यातील वडद या गावची ही घटना आहे. तक्रारकर्ता ग्रामसेवक हे या गावात काम करीत असताना ही घटना घडली होती. वीज बिल न भरल्याने शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ही शाळा मतदान केंद्र असल्याने पुरवठा सुरळीत होणे आवश्यक होते. तशी माहिती पंचायत समिती कार्यालयास देण्यात आली.
आणखी वाचा-शिक्षक म्हणतात ते काम आमचे नाही; निरक्षरांच्या सर्वेक्षणावर प्राथमिक शिक्षक समितीचा बहिष्कार
निवडणूक कार्यालयाची सूचना असल्याने ग्रामसेवक नोटशीट घेवून गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षात गेले. सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक होती. मात्र त्यावेळी कक्षात बसलेल्या सरपंच सुशील वाडतकर यांनी सही देण्यास नकार दिला. तसेच वाद करीत मारहाण केली.यामुळे दुखापत झाल्याची तक्रार ग्रामसेवकांनी पोलीस ठाण्यात केली. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यावर नऊ साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवाद व पुरावे लक्षात घेवून जिल्हा व सत्र न्यायाधीश – ३ व्ही. पी.आदोने यांनी सरपंच वाडतकर यांना दोषी ठरविले. आरोपीस दोन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.