वर्धा : महाआघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची बैठक मुंबईत पार पडली. त्यात वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावा, असा एकमुखी सुर उमटला. सध्या काँग्रसकडे असलेल्या या क्षेत्रात राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार लढत देवू शकतात, असा दावा काहींनी केला. पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील व अन्य नेत्यांनी वर्धेचा कानोसा घेतला.

वर्ध्यात राष्ट्रवादीचा व तोदेखील स्थानिक उमेदवार देवूनच लढवा, असा सार्वत्रिक सूर उमटला. सुबोध मोहिते म्हणाले की, मी रामटेकचा खासदार असताना मोर्शी त्यात येत होता. म्हणून मी लढण्यास पात्र ठरतो, असा दावा झाला. तर आमदार देवेंद्र भुयार व अन्य नेत्यांनी प्रथम हर्षवर्धन देशमुख किंवा मग समीर देशमुख यांचा विचार करण्याचे सुचविले. यावर एकमत होत नसेल तर मग मी लढण्यास तयार असल्याचे मत समता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे यांनी मांडले.

Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार

हेही वाचा – चंद्रपूर : बंदोबस्तादरम्यान महिला पोलिसांसाठी आता ‘शी व्हॅन’ प्रसाधनगृह

सहकार नेते सुधीर कोठारी यांनी वर्धा मतदारसंघात पक्षाची पुरेशी ताकद नसल्याचे स्पष्ट मत नोंदविले. शेवटी पक्षश्रेष्ठींनी ठरवावे. तो जे उमेदवार देतील त्यासाठी सर्व प्रयत्न करू अशी भावना व्यक्त झाली. तीच री अतुल वांदिले यांनी ओढली. समीर देशमुख म्हणाले की, पवार साहेब यांच्याकडे भावना व्यक्त झाल्यात. स्थानिक हवा, यावर एकमत, पण कोण ते सध्या सांगता येणार नाही.

Story img Loader