लोकसत्ता टीम
नागपूर: मान्सूनचा दरवर्षीचा पॅटर्न ठरलेला असतो, पण यावेळी मात्र तो बदललेला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीत शुक्रवारपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी विदर्भात तर शनिवारी पुणे, मुंबई, दिल्ली येथे जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी हा पाऊस मान्सून की मान्सूनपूर्व अशीही चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि मुंबईत पुढचे काही दिवस अशाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मान्सून पहिल्यांदा केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात दाखल होतो.
आणखी वाचा-मान्सून लवकरच राज्य व्यापणार, वादळी पावसाची शक्यता
देशात दक्षिण भागात पहिल्यांदा पाऊस होतो. त्यानंतर दक्षिण-पश्चिम भागातून मान्सून पाऊस पुढे सरकतो. तिथून पुढे सरकल्यानंतर संपूर्ण देशात पाऊस सुरु होतो. देशातील काही राज्यातील इतर मागच्या पावसाळ्याची तुलना केल्यानंतर तिथली पावसाची गती कमी झाली आहे. तर विदर्भात देखील पावसाने प्रवेशाचा मार्ग बदलला आहे. एरवी हा पाऊस बुलढाण्यातून येतो.