नागपूर: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निविष्ठा अनुदान प्रदान केले जात आहे. याअंतर्गत हजारो शेतकरी लाभार्थी ठरले असून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित केले जात आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना सुमारे ५९४ कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. जानेवारी महिन्यात देखील या योजनेअंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले होते. मात्र, अनेक शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत.
जर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असाल, तर खालील सोप्या पद्धतीने आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासू शकता. यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus) भेट द्या. त्यानंतर आपल्या अर्जाचा विशिष्ट क्रमांक संबंधित ठिकाणी प्रविष्ट करा. तसेच नंतर “Search” पर्यायावर क्लिक करा. काही क्षणांतच आपली पेमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल.
पेमेंट वितरित झाले असल्यास त्यामध्ये पेमेंटची रक्कम, वितरणाची तारीख, आणि संबंधित बँकेची माहिती उपलब्ध असेल. तसेच पेमेंट होल्डवर असल्यास, त्यासंबंधित कारणे देखील दर्शवली जातील. जर आपले अनुदान अद्याप वितरित झाले नसेल किंवा पेमेंट तपशील उपलब्ध नसेल, तर संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा अशी सूचना देण्यात येते. पेमेंट वितरित झाले असल्यास त्यामध्ये पेमेंटची रक्कम, वितरणाची तारीख, आणि संबंधित बँकेची माहिती उपलब्ध असेल. तसेच पेमेंट होल्डवर असल्यास, त्यासंबंधित कारणे देखील दर्शवली जातील. जर आपले अनुदान अद्याप वितरित झाले नसेल किंवा पेमेंट तपशील उपलब्ध नसेल, तर संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा अशी सूचना देण्यात येते. खर म्हणजे,अनुदान प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी ही पद्धत राबवली जात आहे. जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत अनुदान वेळेत पोहोचू शकेल.