नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी हे स्वतः काही मागणी करत नसून त्यांची मागणी ही शिकवणीवाल्यांची असते. शिकवणीवाले मागण्या ठरवतात असे वक्तव्य केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्यामध्ये वनविभागाच्या भरतीत सुरू असलेला गैरप्रकार उघडकीस आणला. मात्र सरकार त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. त्यासोबत फडणवीस यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी ‘हॅशटॅग फडणवीस राजीनामा द्या’ ही मोहीम सुरू केली आहे.विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून घेतले जात असलेल्या १०००रुपये शुल्कावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी खाजगी कंपनीकडून परीक्षा घेताना विद्यार्थ्यांवर पडणारा शुल्काचा भार शासनाने कमी करावा अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा >>>आर्णी येथील सराफा व्यवसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

तसेच परीक्षेसाठी इतका खर्च लागत नसताना शासन विद्यार्थ्यांची लूट करत असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी खाजगी कंपनीकडून परीक्षा घेताना शुल्क ठरवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते झाला आहे असे सांगत सदस्यांची मागणी असल्यास यावर फेरविचार करण्याची आश्वासन दिले. मात्र यावेळी बोलताना फडणवीस यांनी विद्यार्थी कुठलीच मागणी करत नसून त्यांची मागणी ही क्लासेसवाले ठरवतात असे वक्तव्य केल्याने विद्यार्थी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

Story img Loader