हिंगणा परिसरातील गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर तरूण- तरूणीने रेल्वेसमोर उडी घेतली होती.त्यात दोघांचा मृत्यू झाला हा खून आहे की आत्महत्या आत्महत्या करणारे प्रेमीयुगुलच होते. समाज स्वीकारणार नाही या भीतीपोटी त्यांनी स्व:ताला संपवले. हिंगणा पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा शोध घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार जितेंद्र नेवारे (३२) रा. मानकापूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे आणि बबीता (बदललेले नाव) रा. गोंदिया असे मुलीचे नाव आहे. जितेंद्र हा बबिता नातेवाईक ( चुलत काका) होता. दोघांचे प्रेम संबंध होते. तर जितेंद्रचे यापूर्वी एक लग्न झाले असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. जितेंद्र हा बाटलीबंद पाण्याचे वितरण करणाऱ्या गाडीवर कार्यरत होता.

हेही वाचा : अकोला : निसर्गरम्य वातावरणात ब्राह्मणी घारीचा मुक्तसंचार

दोघांच्या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांकडून विरोध केला जात होता. दरम्यान जितेंद्र हा मुलीला गोंदिया येथे काही दिवसांपूर्वी भेटून आला होता. त्यानंतर ३१ ऑगस्टला मुलगी जितेंद्रला भेटण्यासाठी नागपुरात आली. त्यानंतर दोघेही हिंगणा परिसरातील गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर केले. येथे रेल्वेसमोर उडी घेऊन दोघांनी आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड होते. पण त्यांनी मुलीच्या मोबाईल वरून नातेवाईकांचा शोध लावला.