दोन दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीला (१७ जुलै) मोठ्या संख्येने नागरिक उपवास करतात. त्यानिमित्त भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिराचे पीठ या पदार्थांचे सेवन केले जाते. हे पदार्थ खाल्यामुळे नागपूरसह राज्याच्या विविध भागात नागरिकांना मोठ्या संख्येने विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यातच या काळात भगर वर मोठया प्रमाणात अस्परजिलस या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव होतो, ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन या सारख्या विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आद्रता बुरशीला अनुकूल आहे. या बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाल्यास अन्न विषबाधा होवु शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) क. रं. जयपूरकर यांनी केले आहे.
नागरिकांनो ही काळजी घ्या
१- भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा व खादयतेल इ. विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावी.
२- भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा, खादयतेल विकत या अन्नपदार्थावर कुठलाही अन्नपदार्थाचा नाव ब्रॅन्ड नसल्यास दुकानदार ब्रॅन्ड बद्दल विचारणा करावी.
हेही वाचा… ‘इंटर्नशिप’ करणाऱ्या डॉक्टरांना समान ‘स्टायपंड’ची मागणी, उच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस…
५- भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. भगरीच्या पीठामध्ये वातावरणातील ओलावा शोषुन घेण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे पीठाला बुरशी लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
६- भगर साठवितांना ती स्वच्छ कोरडया ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्ब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशी वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवु नका. जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नका. भगरीचा वापर करताना ती स्वच्छ धुवन घ्यावी.
७- उपवासाचे अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्यांकडून देयक घेण्यात यावे.
८- भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा पासुन तयार उपवासाचे अन्न पदार्थ लगेच सेवन करावे, शिळया अन्न पदार्थाचे सेवन करु नये.
९- भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. २ ते ३ दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. त्यामुळे या अन्न पदार्थांचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादेत करावे. प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवल्यास संभाव्य धोका टाळता येतो.
हेही वाचा…वज्राघाताने विदर्भात पाच मृत्युमुखी; भंडारा, नागपूर जिल्ह्यांतील घटना
दुकानदारांनी घ्यावयाची काळजी
१- विना देयकाचे कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये.
२- चांगल्या प्रतीची भगर व पॅकबंदच अन्नपदार्थ विकी करावे.
३- मुदतबाहय झालेले अन्नपदार्थ विकी करु नये.
४- भगरीचे पीठ स्वत तयार करुन विकी करु नये.