नागपूर: पावसाळ्यात सर्वत्र हिरवाईची चादर पसरलेली दिसून येते. पावसाळ्यातील सर्वात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानावनातच मिळणाऱ्या रानभाज्या. या पावसाळ्यात निरनिराळ्या पालेभाज्या तसेच रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने पावसाळ्यात या रानभाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये असे बरेचदा म्हंटले जाते. मात्र, या दोन तीन महिन्यात गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या खाण्याकडे लोक वळतात. पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली, कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत.

Loksatta article How to prevent shortage of pulses
लेख: कडधान्यांची टंचाई रोखणार कशी?
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
banana man Success Story
Success Story: ‘शेतकऱ्याला कमी समजू नका…’ केळीच्या ५०० हून अधिक जातींची लागवड; महिन्याला कमावतात लाखो रुपये
Vegetables expensive due to decline in quality despite increase in income
नवी मुंबई : आवक वाढूनही दर्जा खालावल्याने भाज्या महाग
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

हेही वाचा… लोकजागर : ‘नाचून’ काय होणार?

करटोली किंवा कंटोळा ही भाजी डोंगराळ भागात आढळते. कारल्यासारखी दिसणारी छोटी छोटी ‘फळं’ अतिशय औषधी आहेत. क्रोनिक हेडेक दूर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. फायबरचे प्रमाण अधिक असून कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

‘टाकळा’ ही भाजी पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व उघडया माळरानावर सहज आढळून येते. उग्र वास असलेली ही भाजी ‘अ’ जीवनसत्त्वाची परिपूर्ण आहे. दिसायला साधारण मेथीसारखी असणारीही पालेभाजी खूपच गुणकारी आहे. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून घेतल्यास आराम पडतो. ‘आघाडा’ ही वनस्पती ओसाड जमिनीवर, जंगलात आणि शेतात आढळते. या वनस्पतीची मुळे, पाने, फळे औषधात वापरतात. याच्या सेवनाने लघवी साफ होण्यास मदत होते, या भाजीमुळे हाडे मजबूत होऊन अंगातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.

हेही वाचा… गावागावांत शिलाफलक अन् मोदी यांच्या छायाचित्रासह ‘सेल्फी’! ग्रामस्तरावर ‘माझी माती, माझा देश’ अभियान सुरू

वात, हृद्यरोग, मूळव्याध, मुतखडा या आजारांवर गुणकारी असून पचनशक्ती सुधारते. ‘ गुळवेल’ ही भाजी झाडांवर अथवा कुंपणावर असते. याला अमृतवेल, अमृतवल्ली या नावाने देखील ओळखले जाते. ही भाजी खाल्ल्याने भूक वाढत आणि पचनक्रिया सुधारते. मधुमेहासाठी फायदेशीर असून कावीळमध्ये भाजीचे सेवन करावे. ‘काटेमाठ’ ही भाजी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला या भाज्या वाढतात. या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये फुले येतात. बाळंतिणीच्या जेवणात या भाजीचा समावेश केल्यास अंगावरील दूध वाढण्यास मदत होते. तसेच गर्भपात होण्याचे टळते आणि गर्भाचे नीट पोषण होते. पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर गुणकारी असून पचण्यास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते.