नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक दोन आर्थिक वर्षांत एकदा ११ प्रकारच्या तपासण्या बंधनकारक राहणार असून, त्याचा खर्चही महामंडळ उचलणार आहे.

चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीअंतर्गत सीबीसी, थायरॉईड, ब्लड शुगर एचबीएआयसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे-ईसीजी, सीआरपी टेस्ट, आय टेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) या तपासण्या करणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही योजना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च दरम्यान लागू आहे. परंतु, बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाने तपासणीबाबत पत्र काढले आहे. महामंडळात एकूण ८६ हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत. या सर्वांना दोन आर्थिक वर्षात एकदा या तपासणी करायच्या आहे. वरीलपैकी एकही तपासणी न केल्यास या रकमेची प्रतिपूर्ती महामंडळ करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
insurance, Dharavi, 10 crore medical insurance Dharavi,
धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा
Payal Tadvi Suicide, Accused, Head of Nair Hospital,
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयाच्या तत्कालीन विभागप्रमुखांना आरोपी करा, सरकारी पक्षाची विशेष न्यायालयाकडे मागणी

हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.

”चाळिशी ओलांडलेल्या ५० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केव्हा होणार? हा प्रश्नच आहे. तातडीने शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे.”– अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

”नागपूर विभागातील काही चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. इतरही तपासण्या लवकर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.”- विनोद चवरे, नागपूर विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.

Story img Loader