नागपूर : दहावी बारावीच्या निकालात अपयश आलेल्या किंवा मनासारखा निकाल न लागलेले अनेक विद्यार्थी नैराश्येमुळे टोकाचे पाऊल उचलतात. नागपूर ग्रामीणच्या या विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या मानसिक आरोग्य मदत व समुपदेशनासाठी आरोग्य विभागाने टेली-मानस हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४४१६ सुरू केले आहे. २४ तास चालणाऱ्या हेल्पलाईनचा उपयोग घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

आरोग्य विभागाव्दारे सातही दिवस चोविस तास चालणाऱ्या या टेली-मानस हेल्पलाईनचा ग्रामीण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून ग्रामीण नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी मानसिक तणावात असल्यास आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?

हेही वाचा – गोंदिया : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या; उद्या द.पू.म. रेल्वेच्या ३ प्रमुख गाड्या…

मानसिक समुपदेशन करण्यासाठी शहरी भागात अनेक सोयी, हेल्पलाईन उपलब्ध आहे. परंतु ग्रामीण भागात टेली- मानसच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांसाठी ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. परीक्षेच्या निकालामुळे तात्पुरती निराशा येवू शकते, पण त्यामुळे आपल्या भविष्याबद्दल नाउमेद होणे योग्य नाही. शैक्षणिक आव्हानांना सामोरे गेलेल्या, परंतु इतर क्षेत्रांमध्ये भरभराट झालेल्या कुशल व्यक्तीच्या कथा परिक्षेतील गुणांचा विसर पाडणाऱ्या आहेत. अल्बर्ट आइन्स्टाइन यांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात शैक्षणिक संघर्ष करावा लागला. त्यांची अभ्यासातील खराब कामगिरी त्यांना भैतिकशास्त्राची आवड जोपासण्यापासून परावृत्त करू शकली नाही आणि त्यांनी आपले सिद्धांत मांडून क्रांती केली. तर महानायक अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नकाराचा सामना करावा लागला. शैक्षणिकदृष्ट्या सुमार असतानाही त्यांनी चित्रपट विश्वावर आपले नाव कोरले. तणावरहीत होवून आपले सामान्य जीवन स्फुर्तीने जगण्यासाठी सातही दिवस चोवीस तास चालणाऱ्या टेली-मानस हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४४१६ चा लाभ घेऊन तणावरहीत होण्यासाठी ही हेल्पलाईन महत्त्वाची ठरणारी असल्याचेही शर्मा म्हणाल्या.