लोकसत्ता टीम

नागपूर : देशात करोनाच्या ‘जेएन १’ या उपप्रकाराचे रुग्ण वाढल्यावर नागपुरातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. महिन्याभरात येथील ९ करोनाग्रस्तांचे नमुने जनुकीय चाचणीला पाठवले गेले. अहवालातून या रुग्णांतील विषाणूचा उपप्रकार कळेल. तर नागपूर विमानतळावरील तपासणीत एका प्रवाशालाही करोनाचे निदान झाले.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Loksatta explained Is the risk of HMPV increasing
विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

करोनाचा विदर्भात पहिला रुग्ण नागपुरात आढळला. तेव्हापासून आजपर्यंत विदर्भातील करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूही नागपुरात नोंदवले गेले. नागपुरात आंतराष्ट्रीय विमानतळ आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून रेल्वे व रस्ते वाहतुकीचे मार्ग चांगले असल्याने नागरिकांची रेलचेल बघत लवकरच संक्रमण पसरत असल्याचा आरोग्य यंत्रणेचा अनुभव आहे.

आणखी वाचा-बुलढाणा: दुचाकीला वाहनाची धडक; दोघे ठार, एक गंभीर

दरम्यान, नागपुरात गेल्या महिन्याभरात करोनाचे ९ रुग्ण आढळले. त्यापैकी एका रुग्णाची इंग्लंड प्रवास, एका रुग्णाचा हिमाचल प्रदेश प्रवासाचा इतिहास आहे. तर ४ नागपूर ग्रामीणच्या रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास नाही. तर नागपूर विमानतळावर दोन दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्यासह इतर लक्षणाच्या एका महिलेमध्ये केलेल्या तपासणीत करोनाचे निदान झाले. परंतु, ही महिला पुणे येथे तेव्हाच निघून गेली. त्यामुळे नागपूर महापालिकेने तेथील आरोग्य यंत्रणेला या महिलेबाबत माहिती दिली आहे. या महिलेसह यापूर्वीच्या आठ अशा एकूण ९ रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी निरीतील प्रयोगशाळेत पाठवले गेले आहे. त्याच्या अहवालानंतरच या रुग्णांमधील करोनाच्या उपप्रकाराचे निदान होईल. या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध महापालिकेकडून घेतला गेला असून कुणालाही प्राथमिक लक्षणे नसल्याचा त्यांचा दावा आहे. तर नागपुरातील एक रुग्ण पुणे येथे गेली असून इतर सगळेच रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती आहे.

नागपूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज

करोनाच्या जेएन-१ व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महापालिकेने बैठक घेत आरोग्य यंत्रणा दक्ष ठेवण्याची सूचना केली. येथील सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि प्राणवायू रुग्णशय्येची यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारासह करोना चाचणी केली जाईल. मेडिकल, मेयो येथे करोना चाचणी केंद्र सुरू आहे. सोबत नागपूर महापालिकेची चाचणी केंद्रे लवकरच सुरू केले जातील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना खबरदारी घ्यावी, मुखपट्टी लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर सुरू करावा, असे आवाहन नागपूर महापालिकेकडून केले गेले.

आणखी वाचा-नागपूर : मृतदेहांची शवविच्छेदनासाठी २० किलोमीटर लांबीची फरफट थांबणार!

नाकाद्वारे वर्धक मात्रेचे नियोजन

नागपूर शहरतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नागपूर महापालिकेकडून नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या वर्धक मात्रेबाबत नियोजन करण्याच्या सूचना नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे.

करोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’मुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास करोना चाचणी करून घ्यावी. नागपूर शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे करोना चाचणी केंद्र सुरू आहेत. याशिवाय नागपूर महापालिकेची चाचणी केंद्रे देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी करोनामुळे होणारा धोका लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाताना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. मास्क लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Story img Loader