यवतमाळ : ‘एक धाव पर्यावरणासाठी’ ही थीम घेवून आज रविवारी पहाटे यवतमाळकरांसह महाराष्ट्रातून आलेले शेकडो धावपटू यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनमध्ये धावले. येथील नेहरू स्टेडियममधून पहाटे ६ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तीन, पाच, १० आणि २१ किलोमीटर अशा चार गटात पार पडलेल्या या स्पर्धेत दोन हजार ५०० च्या वर धावपटू सहभागी झाले होते.

सुदृढ आरोग्याची प्रेरणा मिळावी यासाठी कॉटन सिटी रनर्स असोसिएशन गेल्या तीन वर्षापासून यवतमाळ येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यावर्षी ‘रन फॉर एन्व्हायरमेंट’ हे स्लोगन घेऊन धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले. १० आणि २१ किलोमिटर गटात ‘प्रोफेशनल रनर्स’चा सहभाग अधिक होता. ५ किमी गटात ‘फिटनेस रनर्स’ तर तीन किमी च्या ‘फन रन’ गटात अनेक पालक आपल्या लहान मुलांसह सहभागी झाले होते. २१ किमी स्पर्धा नेहरू स्टेडियम ते करळगाव घाट वाघाई मंदिर ते परत स्टेडियम, १० किमी स्पर्धा नेहरु स्टेडियम ते पॉलिटेक्निक कॉलेज ते परत स्टेडियम, पाच किमी स्पर्धा नेहरू स्टेडियम ते न्यायालय ते परत स्टेडियम आणि तीन किमी स्पर्धा नेहरू स्टेडियम ते येरावार चौक ते परत स्टेडियम अशा मार्गाने झाली.

mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
ulta chashma manoj jarange patil
उलटा चष्मा: २४ तासांत ८००!
raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”

हेही वाचा – सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी

पहाटे पाच वाजता पासूनच येथील नेहरू स्टेडियम धावपटू व बघ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. स्पर्धेसाठी यवतमाळसह, नागपूर, अमरावती, अकोला, गडचिरोली, वर्धा, सांगली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, कारंजा, हिंगोली यासह विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले. कारंजा, हिंगोली येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यवतमाळ पोलीस दलातील ६०० पोलीस कर्मचऱ्यांचा सहभाग वैशिषटयपूर्ण ठरला. यावेळच्या मॅरॅथॉनचे मुख्य प्रायोजक वन विभाग असल्याने या विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्रीडा संघटना, डॉक्टर्स, इंजिनियर, पत्रकार संघटनांचा ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजनात महत्वाचा सहभाग आहे. यावेळी स्पर्धेत धावपटूंची संख्या वाढली होती. गतवर्षी ही संख्या दोन हजार ३०० इतकी होती.

हेही वाचा – “एच५एन१” ने तीन वाघ मृत्युमुखी, राज्यातील प्राणिसंग्रहालयांना “हाय अलर्ट”

स्पर्धेच्या नियोजनासाठी ४०० स्वयंसेवक, ७५ शारीरिक शिक्षक मॅरॅथॉनच्या मार्गात मदतीसाठी सहभागी झाले होते. धावपटूंना आरोग्याची समस्या उद्भवल्यास १४ डॉक्टर्स आणि पाच रुग्णवाहिका स्पर्धा दरम्यान तैनात होत्या. मात्र संपूर्ण स्पर्धा सुरळीतपणे पार पडली. नेहरू स्टेडियमवर सहभागी स्पर्धकांसाठी विविध ॲक्टिव्हिटी, झुंबा डान्स ठेवण्यात आला होता. स्पर्धेत सहभागी प्रत्येक धावपटूने फिनिशर पॉइंट पार केल्यानंतर मेडल देवून गौरविण्यात आले.

Story img Loader