लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सेवेवर असलेल्या दोन मतदान अधिकाऱ्याला गुरूवारी भोवळ आली. या दोघांना तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारानंतर त्यांना सुट्टी दिली.

निवडणूक मतदान अधिकारी अनुजा वाघमारे (४२) दीक्षाभूमी येथील कुर्वेज न्यू मॉडेल स्कूल येथे कर्तव्यावर होत्या. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान त्यांना उन्हामुळे भोवळ आली. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने लगेच त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले गेले. दोन वेळा ईसीजी काढत त्यांना सलाईन लावले गेले. प्रकृती स्थिर झाल्यावर दुपारी ३.२० वाजता त्यांना सुट्टी दिली गेली.

आणखी वाचा-VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…

दरम्यान याच केंद्रावर कर्तव्यावर असलेले मनोज चौधरी यांनाही भोवळ आल्याने दुपारी २.१० वाजता मेडिकलमध्ये दाखल केले. इएनटी विभागाचा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. औषधोपचारानंतर त्यांना २.३० सुटी देण्यात आली. नागपुरातील गुरुवारचे तापमान ४१ अंशावर गेले. उन्हाची स्थिती लक्षता घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचाºयाला दुर्दैवाने का गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस’ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचाही सूचना महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या. आरोग्य विभागाने मेयो, मेडिकलसह काही खासगी हॉस्पिटलला ‘अलर्ट’वर ठेवले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health of two election officials deteriorated due to heat wave in nagpur mnb 82 mrj
Show comments