गोंदिया: दरवर्षी पाऊसाचे दिवस काहीसे ओसरत असताना नवेगावबांध जलाशयात पवन डोड्याचे उत्पादन होत असून, याला खरेदीकरिता ग्राहकांची अधिक पसंती देखील दिसत आहे. त्यामुळे या परिसरातील मासेमार बांधवांना एक जोड धंदा मिळत असल्याने सुगीचे दिवस आले आहे . पवन डोड्याच्या विक्रीतून वर्षाला ५० ते ६० हजार रुपये कमाई होत असल्याचे मासेमारबांधव सांगतात. हे फळ आरोग्यासाठी पौष्टीक मानले जाते.गेल्या दहा दिवसांपासून नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, धाबे पवनी अशा बाजार च्या ठिकाणी हे पवन डोडे विक्रीसाठी येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलाशयाच्या किनाऱ्यावर वसलेल्या जांभळी, येलोडी, रांजीटोला या गावातून तसेच नवेगावबांध, मुंगली या गावातील मासेमार बांधव पवन डोड्याची विक्री करून आपली उपजीविका चालवतात. याला वेगवेगळी नावे आहेत .या परिसरात याला पवन डोडे म्हणतात,पवन डोडे अर्थात गोखरा हे सप्टेंबर ते नोव्हेंबर व मार्च ते मे या महिन्यामध्ये लागतात. त्याला उकळून किंवा कच्चे ही खाता येते. बरेच लोक खूप आवडीने खातात. गोखरे खाल्ल्यामुळे शरीराचे तापमान चांगले राहते. स्थानिक लोक आधी वाळलेल्या गोखऱ्यांचा औषधी म्हणून उपयोग करत होते. अतिसार, निद्रानाश, ताप, शरीरातील उष्णता असंतुलन आणि जठराची सूज बरे करण्यासाठी संपूर्ण वनस्पती औषधी म्हणून वापरली जाते.

हेही वाचा >>>बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप : सोंटू जैनच्या जामिनावर २६ सप्टेंबरला निर्णय

नेलुंबो नुसिफेरा म्हणजे भारतीय कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिला ‘लक्ष्मी कमळ’ किंवा ‘पवित्र कमळ’ असे देखील म्हणतात. या वनस्पतीची जातकुळी नेलुंबो आहे.कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्याएवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा ‘कमळगठ्ठ्याचे मणी’ असे म्हणतात. यालाच परिसरात बहुतांश पवन डोडे किंवा गोखरू या नावाने ओळखले जातात.

हेही वाचा >>>चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

उत्पन्नाचे हंगामी साधन

फळाच्या बिया आरोग्यासाठी पौष्टीक असून खायला गोड वाटतात. परिसरातील लहान मुले व मोठ्यांनाही हे फळ फारच आवडतात. कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी वापर होतो.कमळ हे भारत आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय फुल आहे. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस म्हणतात.उन्हाळ्यात भिसी, बिसी (कमळ कांदे) आणि गोखरे विक्री करून मजुरीच्या माध्यमातून दीड ते दोन महिन्यात ५० हजार रुपये पेक्षा जास्त रुपये एका परिवाराला मिळतात. परिसरातील हजारो मजूर वर्गातील कुटुंबासाठी व मत्स्य उत्पादनासाठी नवेगावबांधातील नैसर्गिकरित्या उत्पादन होत असलेले पवन डोडे हे मासेमारांसाठी उत्पन्नाचे हंगामी साधन म्हणून वरदान ठरले आहे.

पवन डोडे खाण्यासाठी एकदम गोडसर, चविष्ट असतात. पोटदुखीवर उपचार म्हणून याचे सेवन करता येईल. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही वनस्पती आहे. आज पवन डोडे अर्थात गोखरे विकून लोक छोटासा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायातून आर्थिक मदत होते. –सरिता मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, सावरटोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthier pawan dodella from navegaonbandh reservoir preferred by consumers gondiya sar 75 amy