नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत महापालिकेतील मुख्यालयात तसेच सर्व झोन कार्यालयात दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने केली जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेत परित्रक जारी करण्यात आले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना ‘हॅलो’ ऐवजी ‘ वंदे मातरम’ या अभिवादनाने सुरुवात करावी या राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेत बुधवारपासून त्याची सुरुवात होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. महापालिकेतील सर्व विभागप्रमुख, झोन क्रमांक १ ते १० या झोनचे सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना या संदर्भात काही सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करा ; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

महापालिका अंतर्गत सर्व कार्यालयात दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संभाषण करताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने सुरुवात केली जाईल. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद साधतानाही ‘वंदे मातरम’ असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करावे. कार्यालयात/संस्थेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम’ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृत करावी, विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती ‘वंदे मातरम’ या शब्दांनी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, याशिवाय ‘वंदे मातरम’ अभिवादनाचा अधिकाधिक वापर करून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hear phone call vande mataram instead of hello commissioner radhakrishnan b nagpur carporation tmb 01