लोकसत्ता टीम
बुलढाणा: चिखली तालुक्यातील गावात लग्नाकरिता आलेल्या अकोला येथील युवकाचा दुर्देवी अंत झाला. यामुळे आज संध्याकाळी आयोजित लग्न समारंभावर विरजण पडले आहे.
साहिल जगताप (२२ वर्ष, राहणार अकोला) असे मृत युवकाचे नाव असून मित्राच्या लग्नासाठी तो चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे आला होता. आज गुरुवारी संध्याकाळचे लग्न होते. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी व खरेदीसाठी तो मित्रासह चिखलीत आला होता.
आणखी वाचा-नागपूर: निलंबनानंतर कुलगुरू डॉ. चौधरींनी पदभार स्वीकारला
दरम्यान, पोहोण्यासाठी हे सर्व जाफराबाद मार्गावरील ‘स्विमिंग पूल’मध्ये गेले. अचानक साहिलला हृदयविकाराचा झटका आला. मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.