सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतातील उभे पीक गारपिटीने ध्वस्त झाले आहे. कारंजा तालुक्यातील सेलगाव, धमकुंड, जुनापणी या गावात गारा पडल्याने संत्रा बागांना तडाखा बसला. शोभा गाखरे यांच्या बागेतील चाळीस झाडे आडवी झाली. समुद्रपुर तालुक्यात अनेक गावातील उन्हाळी भाजीपाला मातीमोल झाला. पालक,कोथिंबीर, टोमॅटो व अन्य फळभाज्या सडल्या.
हेही वाचा >>>अकोला: भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळले; सभामंडपावर वृक्ष पडून सात जणांचा मृत्यू, २६ जखमी
सेलू तालुक्यातील पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पावसामुळे दोन हेक्टर वरील पपई बाग कोसळली आहे. काही ठिकाणी फळं झडली. देवळीत गहू, चारापीक, भाजीपाला,आर्वीत भाजीपाला,आष्टी तालुक्यात गहू,हरभरा व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी खात्याने नमूद केले. हा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यावर नुकसान नेमके कळणार आहे