चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: २२ हजाराहून अधिक कुटुंबांना बाधित करणाऱ्या नागपूरच्या महापुराचे महत्व, शासनाच्या लेखी फक्त सानुग्रह अनुदान वाटप करण्या ऐवढेच असले तरी पुरात सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो पूरबाधितांच्या हालअपेष्टा अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची गरज असताना राज्यकर्ते त्यांना ‘आम्हीच कसे विकास पुरुष’ हे चित्रपटाच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागपूरच्या पुरावरील हा उतारा लोक कितपत मान्य करतात हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> ठाणे, डोंबिवलीत मनसेची चहूबाजूंनी कोंडी

सोमवारी नागपूरमध्ये अभिजित मुजमदार निर्मित ‘ गडकरी’ या चित्रपटाचे ‘टीझर’ भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिलिज करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबरला हा चित्रपट पडद्यावर झळकणारआहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘ विकास पुरुष’ ही प्रतिमा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरीकडे २३ सप्टेंबरला नागपूरमध्ये महापूर आला होता. त्यात २२ हजार कुटुंब (हा सरकारी आकडा, प्रत्यक्षात जास्त ) बाधित झाले. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुलांची पुस्तके, शाळांमधील मुलांचे दस्तावेज व अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे नष्ट झाली. व हे ज्या पुरामुळे हे सर्व झाले तो येण्यासाठी नागपूरचा राक्षसी विकासच कारणीभूत ठरला, असा शासनाच्या व सह खासगी यंत्रणा दावा करतात. या सर्व पाश्वभूमीवर ‘ गडकरी’ या चित्रपटाचे येणे आणि त्यात ‘विकास पुरूष’ ही संकल्पना लोकप्रतिनिधींबाबत मांडणे हे महत्वाचे ठरते. नागपूरचा पूर ही नैसर्गिक आपत्ती तर चित्रपट हा नेत्यांच्या कारकीर्दीवरचा जीवनपट या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण त्याचा संबंध लावणे चुकीचे आहे, अशी मांडणी सत्ताधारी पक्षाकडून केली जाते. पण यातील समानधागा हा विकासाचा असल्याने चित्रपटावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच तो पुरावरचा उतारा आहे की डागणी, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy loss due to flood in nagpur and vikas purush nitin gadkari biopic print politics news zws
Show comments