यवतमाळ : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने दोन लाख ५३ हजार ८४६ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालातून समोर आले आहे. सध्या पावसाने ओढ दिली असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या हानीची चिंता लागली आहे. जुलैमधील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कपाशीला बसला आहे. एक लाख ३१ हजार ७३५ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले, तर ९५ हजार ७२९ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती आता शेतकर्‍यांना सतावत आहे.

खरिपातील पेरणीनंतर आवश्यकता असताना पावसाने दडी मारली. त्यावेळी पावसाअभावी बहुतांश शेतकर्‍यांच्या शिवारातील पिकांनी माना टाकल्या. सिंचन सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांना  पीक वाचविता आले. तेव्हा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. पाऊस येईल की नाही या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने मात्र देशोधडीला लावले. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह मातीही खरडून गेली. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यावर यंत्रणा कामावर लागली.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Mumbai Municipal Corporation owes Rs 16500 crore to the government mumbai news
सरकारकडे मुंबई पालिकेचे साडेसोळा हजार कोटी थकीत; सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास

हेही वाचा >>> गोंदिया : संतप्त शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र काढली आमदारांच्या घरासमोर; जोपर्यंत धानाचे चुकारे मिळणार नाही तोपर्यंत..

शेतकर्‍यांकडून मदतीची मागणी जोर धरत असताना एक महिन्यानंतर अहवाल तयार करून २३६ कोटींच्या निधीच्या मागणीचा अहवाल आयुक्तांकडे पाठविण्यात आला. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरात मदत कधी पडणार, यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. १३८ हेक्टर जमीनीचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची ही हानी कधीही भरून येणार नाही, अशी आहे. १० हजार ६१८ हेक्टर शेती खरडून गेली आहे. हे दुरुस्ती होणारे क्षेत्र आहे. शेतात तण वाढले असताना ते काढण्यासाठी शेतकर्‍यांच्या हातात पैसे नाही.

हेही वाचा >>> कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

उसनावरीने पैसे द्यायलाही कुणी तयार नाही. याच विवंचनेत येरद येथील एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मुलांचे शिक्षण करावे, आजारपणा पैसा लावावा, घरात काय खावे, असे एक ना अनेक प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभे ठाकले आहे. एकूण दोन लाख ६४ हजार ९८६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. त्याचा परिणाम शेतीतून निघणार्‍या उत्पन्नावर होणार आहे.

आठ तालुक्यांना सर्वाधिक फटका

आठ लाख ८७ हजार ७३३ हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण दोन लाख ५४ हजार २२८ हेक्टरचे नुकसान झाले. आठ तालुक्यांना २० ते ३३ हजार हजार हेक्टरपर्यंत सर्वाधिक फटका बसला आहे. यवतमाळ तालुक्यात २६ हजार ४६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.तर कळंब २६ हजार ४८६, घाटंजी १५ हजार ७७७, राळेगाव पाच हजार ४४६, दारव्हा ३३ हजार ११, नेर २८ हजार १५९, आर्णी २९ हजार ८६३, बाभूळगाव दोन हजार ७८५, पुसद १५८, दिग्रस २१ हजार २५५, उमरखेड १८ हजार ८३४, महागाव २९ हजार ५०९, पांढरकवडा चार हजार ५५, वणी चार हजार ३२५, मारेगाव एक हजार ७७६ आणि झरीजामणी तालुक्यात सहा हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Story img Loader