लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नाशिक, पुणे आणि सातारासह विदर्भात अमरावती, नागपूर येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया येथे काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊसही होऊ शकेल. या काळात विदर्भामध्ये मेघगर्जनेचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी “ऑरेंज अ‍ॅलर्ट” देण्यात आला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain alert today in nagpur rgc 76 mrj