चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शनिवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. कुठे रिमझिम तर कुठे तुरळक पाऊस सुरू होता. तर कधी उन्हदेखील तापत होते. मात्र शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत पाऊस थांबला. मात्र रात्री पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आली. त्यानंतर शनिवारी पहाटेपासून तर सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाला.
हेही वाचा – नागपूर : कन्हान नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू
या पावसामुळे शहरातील मुख्य मार्गावर तथा शहरातील खोल भागातील वस्त्यात पाणी साचले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.