बुलढाणा : तीन चार फूट पाण्याखाली असलेली हजारो हेक्टरवरील पिके, खरडून गेलेली अन आता कायमची निरुपयोगी ठरलेली हजारो हेक्टर शेत जमीन, ठिकठिकाणी दिसून येणारे मुक्या जनावरांचे मृतदेह, जमीनदोस्त झालेली हजारो घरे आणि सर्वस्व गमावलेल्या हजारो शेतकरी व ग्रामस्थांचे उदास चेहरे.. हे चित्र आहे बुलढाणा तालुक्यातील संकटग्रस्त दोन तालुक्याचे.

निसर्ग वा वरुणराजाचे तांडव किती क्रूर असू शकते, त्याचे परिणाम किती प्रलयकारी असू शकतात याचे उदाहरण म्हणजे जळगाव व संग्रामपूर तालुके ठरले आहे. संवेदना हरवलेले नेते व मर्यादित प्रशासकीय यंत्रणा यामुळे हा विध्वंस अधिकच ठळकपणे जानविणारा ठरतो. जळगाव व संग्रामपूर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील होत्याचे नव्हते झाले. यातही सर्वात भीषण नुकसान अर्थात कृषी क्षेत्र व तारणहारच नसलेल्या शेतकऱ्यांचे! काही तासांच्या आत शेतजमिनीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही तालुक्यांतील मिळून तब्बल १२ हजार २५५ हेक्टर सुपीक शेतजमीन खरडून गेली आहे. तसेच अर्ध्या लाखांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ६० हजार २०९ हेक्टरवरील खरीप व अन्य पिकांची अक्षरशः माती झाली! यामध्ये सोयाबिन, कापूस, मका, तूर या खरीप पिकांसह संत्री, केळी व भाजीपाला यांचाही समावेश आहे. अंतिम अहवाल वा नुकसान यापेक्षाही जास्त राहणार हे उघड आहे.

Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
Birds were counted at Tansa and Modaksagar Lakes by International Wetland and Forest Department
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

हेही वाचा – मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वर्धेकर रस्त्यावर

छतच काय घरच उरले नाही!

दरम्यान निसर्गाच्या झंझावतात तब्बल ४३८५ घरे जमीनदोस्त झाली आहे. ५८२ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. ३८०३ घरांची अंशतः पडझड असली तरी ती राहण्यायोग्य राहिली नाहीये!

स्थलांतर

या परिणामी किमान ५२७ कुटुंबांचे स्थलांतरण करावे लागले आहे. या कुटुंबातील आपदग्रस्त सदस्यांची संख्या २१०० च्या वर आहे. सामाजिक सभागृह, शाळा अशा ठिकाणी तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहे. याशिवाय अनेकांनी नातेवाईक, दानशूर व्यक्ती वा शेजाऱ्याकडे आसरा घेतला आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने घेतली आहे. मात्र नेते मंडळी, पदाधिकारी, सामाजिक संघटना व संस्था यांनी घेतलेला आखडता हात, व उदासीनता खुपणारी ठरावी अशीच आहे.

हेही वाचा – वाशिम : मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब; नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा खोळंबा

पशुधन हानी

अतिवृष्टी वा पुरात वाहून दगावलेल्या मुक्या जनावरांची संख्याही लक्षणीय आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा २०३ इतका आहे. यामध्ये १०९ मोठ्या तर ९४ लहान जनावरांचा समावेश आहे.

Story img Loader