लोकसत्ता टीम
चंद्रपूर: शहरात शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळित झाले.
शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पाणी साचले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा गारवा हळूहळू कमी होत असताना गुरूवारी सायंकाळी आठ वाजता पावसाचे हलके थेंब सुरू झाले होते. मात्र पाऊस पडला नाही. पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. जवळपास अर्धा तास हा मुसळधार पाऊस सुरू होता.
आणखी वाचा-नागपूर : हत्ती चक्क १२ दिवसांच्या हक्काच्या वैद्यकीय सुट्टीवर!
या पावसामुळे पहाटे व सकाळी फिरायला जाणाऱ्यांची गैरसोय झाली. शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पावसाचे पाणी साचले होते.