चंद्रपूर : शहरात सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचले. बालवीर वार्डातील अनेक घरात पाणी शिरले असून मुख्य मार्गावर आझाद बगीचाजवळ सर्वत्र पाणीच पाणी आहे. शहरातील अनेक रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुरुवारी सकाळी सहा वाजता हलक्या पावसाच्या सरी पडल्या. मात्र आकाशात ढगांची गर्दी दाटलेली होती. अशातच ११.४५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले. मुख्य मार्गावरील आझाद बगीचा आणि कस्तुरबा मार्गांना जलतरण तलावाचे स्वरूप आले होते. अवघ्या दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने सखोल भागात पाणी शिरले.

हेही वाचा – अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

हेही वाचा – “हे गणराया! ओबीसींच्या मागण्या पूर्ण कर…”, गोंदियात देखाव्याच्या माध्यमातून साकडे

शहरातील राजकला टॉकीज मागील बालवीर वार्ड परिसरातून मोठा नाला वाहतो. पावसामुळे हा नाला दुथडी भरून वाहू लागला. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आणि संपूर्ण रस्ता व हा परिसर जलमय झाला. दुचाकी व चारचाकी वाहनेदेखील पाण्याखाली आली होती. अवघ्या दीड तासाच्या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या दाव्याची पोलखोल केली.