वाशीम : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कुठे रिमझिम तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासाह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील काही भागात २० सप्टेंबर रोजी रात्री पाऊस झाला तर आज २१ सप्टेंबर रोजी दुपार नंतर अचानक ढग दाटून येताच वाशीम, मंगरूळपीर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसेच रिसोड व इतर ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला.

हेही वाचा >>>“साहेब… आमच्या धानाचे दर कधी ठरवणार?” गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांचा प्रश्न; शेतकऱ्यांचे हमीभावाकडे लक्ष …

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन पिके धोक्यात आली होती. सर्वत्र शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in taluk including washim town pbk 85 amy