लोकसत्ता टीम
वर्धा : आज दुपारपासून जिल्ह्यात जोरदार वृष्टी सुरू झाली. ठिकठिकाणी या पावसाने जनजीवन ठप्प पडले.
वर्धा तालुक्यात करंजी काजी या गावात वीज पडून एक म्हैस ठार झाली. तिमंडे यांच्या शेतात बांधून असलेल्या तीन पैकी एका म्हशीवर वीज कोसळली.तसेच लहान गावात नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद पडली आहे.
दुपारी तीन नंतर मुसळधार वृष्टी सुरू झाली आहे. प्रशासनाने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देत खबरदारी घेणे सुरू केले आहे. वर्धा शहरात तर पावसाचे थैमान सर्वकाही ठप्प करणारे ठरले आहे. वर्धा, सेलू, देवळी, समुद्रपूर या तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे.