यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सर्वत्र संततधार सुरू असून जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. बेंबळा, अडाण आणि सायखेडा धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वर्धा, अडाण आदि नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने यावर्षी विलंबाने हजेरी लावली. जिल्ह्यात अद्यापही अनेक तालुक्यात आवश्यक असा पाऊस कोसळला नाही. तर बाभूळगाव, कळंब, नेर, वणी, मोरगाव, झरीजामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव या तालुक्यांतील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या मंडळांत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बियाणे खरडून गेले. अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
strawberry season start late by 15 days leading to limited market supply
बदलत्या हवामानाने स्ट्रॉबेरीचा हंगामाला विलंब

हेही वाचा >>>नागपूर: टेकडी उड्डाण पुलाच्या पाडकामाला सुरूवात , झाडे कापणी सूरू

अमरावती जिल्ह्यातील पावसामुळे बाभुळगाव तालुक्यात बेंबळा नदीवर असलेल्या बेंबळा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे चार गेट ५० सेंमीने उघडण्यात आल्याने बेंबळा व वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील पावसामुळे कारंजा तालुक्यात असलेल्या अडाण प्रकल्पाचे पाच गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अडाण नदीला पूर आला आहे. या नदीवरील बोरी अरब येथील पूल पाण्याखाली गेल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. केळापूर तालुक्यातील सायखेडा प्रकल्पातून ९०.४८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वणी तालुक्यातील निगुर्डा नदीला पूर आल्याने शिवनी-सावंगी मार्ग बंद होता. पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.