बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील रायपूर परिसराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे रायपूर येथील नदीला मोठा पूर आल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली. पुलावर दोन्ही बाजूला भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या. आज पोर्णिमेनिमीत्त सैलानी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र सैलानी- बुलढाणा मार्गावरील रायपूर येथील नदीला पूर आल्याने भाविक नदीकाठी अडकले. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आबालवृद्ध भाविकांचे बेहाल झाले. दुरदुरून भाविक सैलानी येथे आले होते. पूर ओसरल्यानंतरच त्यांना पुढे जाता आले.
बुलढाणा: रायपूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले, नदीला पूर,भाविकांची वाहने अडकली
सैलानी- बुलढाणा मार्गावरील रायपूर येथील नदीला पूर आल्याने भाविक नदीकाठी अडकले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-09-2023 at 20:05 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain lashed raipur area in buldhana zws