बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील रायपूर परिसराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे रायपूर येथील नदीला मोठा पूर आल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली. पुलावर दोन्ही बाजूला भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या. आज पोर्णिमेनिमीत्त सैलानी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र सैलानी- बुलढाणा मार्गावरील रायपूर येथील नदीला पूर आल्याने भाविक नदीकाठी अडकले. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आबालवृद्ध भाविकांचे बेहाल झाले. दुरदुरून भाविक सैलानी येथे आले होते. पूर ओसरल्यानंतरच त्यांना पुढे जाता आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा