Maharashtra Monsoon Update : बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळाले आहे. पश्चिम व उत्तर भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती असल्यामुळे पुढील काही तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो.
हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ची ही काय अवस्था! २०१५ मध्ये झाली होती घोषणा, पण…
हेही वाचा… Maharashtra News Live : “जालना लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांनी आधीच माफी मागितली असती, तर…”
हवामान खात्याच्या अंदाजनुसार आठ सप्टेंबरपर्यंत राज्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी केला होता. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून घाट माथ्यावर मध्यम ते हलका पाऊस पडत आहे. आता हवामान खात्यानुसार सात सप्टेंबर पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रात २४ तासानंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.