नागपूर : परतीच्या पावसाने जोर धरला असून गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने ठाण मांडले आहे. कालपर्यंत हळुवार पडणाऱ्या पावसाने आज मात्र रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आभाळ ढगांनी भरलेले आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असा लपंडाव सुरू असताना आज सकाळपासूनच ढगांच्या गडगडटासह पावसाने हजेरी लावली आहे. साधारण कोजागिरीपासून थंडी पडायला सुरुवात होते, पण येथे पाऊस मात्र थांबायला तयार नाही. त्यामुळे रस्त्याची अर्धवट कामे आणि त्यात मुसळधार पावसाची हजेरी यातून वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली.

Story img Loader