नागपूर : राज्यातील सर्वच भागांत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर गेल्या आठ दिवसांत पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. मात्र, अतिमूसळधार पाऊस २८ जुलैपर्यंतच राहील आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. आज शुक्रवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे, तर २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा – नागपूर : आई रागावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

हेही वाचा – गडचिराेली : भाजप खासदार, आमदारांविरोधात हजारो आदिवासी युवकांचा आक्रोश मोर्चा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यालाही शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain warning in all parts of maharashtra today rgc 76 ssb
Show comments