गोंदिया : हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज, सोमवार २६ जून सायंकाळपासून २७ जून २०२३ रोजी रात्रीपर्यंत गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

हवामान विभागाने सोमवारी जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, सोमवार आणि मंगळवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ दाखविण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहावे, तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन

हेही वाचा >>>नागपूर: सॉरी मम्मी-पप्पा.. ड्रग्सच्या व्यसनाने युवकाची आत्महत्या

नागरिकांना सूचना

नागरिकांनी संरक्षणात्मक वस्त्रे परिधान करवीत आणि घरातच रहावे, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा सुरू असताना खिडक्या आणि दरवाजापासून दूर रहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखोल भाग आणि जिथे पाणी साठते त्या भागात जाऊ नये. खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहन चालवणे टाळा. शक्य असल्यास, पार्क करा आणि तुमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी पाऊस कमी होईपर्यंत किंवा थांबेपर्यंत प्रतीक्षा करा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबूत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, भांडे छिद्र किंवा विजेच्या तारा असू शकतात. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा. फ्लॅश पूर चेतावणी आणि अद्यतनांसाठी सतर्कता आणि हवामान अहवालांचे निरीक्षण करावे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.